पेट्रोलच्या दरात मंगळवारी मध्यरात्रीपासून लिटरमागे ३५ पैशांनी वाढ झाली आहे. नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोलसाठी आता ७४ रुपये ६८ पैसे प्रति लिटरमागे मोजावे लागणार आहेत. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने, पेट्रोलमध्ये वाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक कर आणि व्हॅट आकारणीनुसार प्रत्येक शहरात प्रति लिटर पेट्रोलचे दर वेगवेगळे आहेत. दिल्लीत पेट्रोल लिटरमागे ६७.५६ रूपये झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा