मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील
‘मॅगी’ नूडल्सच्या नऊ प्रकारांवरील बंदी उठवण्याच्या, तसेच नेस्ले कंपनीला नव्याने चाचणी करवून घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध करण्यात आलेल्या याचिकेवर बाजू मांडावी, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नेस्ले इंडिया लिमिटेडला सांगितले, त्यामुळे खवय्यांची लाडकी मॅगी पुन्हा एकदा संकटात आली आहे.
खाद्यपदार्थाचे नियमन करणाऱ्या ‘फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (एफएसएसएआय) केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर १३ जानेवारीला सुनावणी होईल व त्या वेळी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या विनंतीबाबत विचार केला जाईल, असे न्या. दीपक मिश्रा व न्या. प्रफुल्लचंद्र पंत यांच्या खंडपीठाने सांगितले.
‘मॅगी’ नूडल्समध्ये शिसाचे प्रमाण जास्त असल्याबद्दल एफएसएसएआयने नेस्ले कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र यात नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा भंग झाल्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने ही नोटीस रद्द ठरवली, तसेच कंपनीने नव्याने केलेल्या चाचण्या सकारात्मक आल्यास तिला आपले उत्पादन बाजारात विकण्याचीही न्यायालयाने परवानगी दिली. उच्च न्यायालयाने १३ ऑगस्टला दिलेल्या व ४ सप्टेंबरला सुधारणा केलेल्या या आदेशाविरुद्ध एफएसएसएआयने अपील केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा