राजस्थानमधील उदयपूरमध्ये आजपासून काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात होत आहे. या शिबिरात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या शिबिरात पक्षाचे ४३० हून अधिक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. २०१४ पासून पक्षाचा दारूण पराभव होत असताना काँग्रेसचे हे पहिलेच चिंतन शिबिर अधिवेशन आहे. दरम्यान, काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्व बदलाबाबत सूचना केली होती. त्यामुळे पक्ष तरूण आणि नवे चेहरे नेतृत्वाच्या पातळीवर आणण्याचा विचार पक्ष करेल, असे मानले जात आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या माहितीनुसार म्हटले आहे की, पक्षाचे नेते काँग्रेसला तरुण पक्ष म्हणून नाव देण्यावर जोर देत आहेत. त्यासाठी संघटनेत पदे भूषविण्याच्या आणि सर्व स्तरावर निवडणुका लढवण्याच्या नेत्यांच्या वयोमर्यादेचा विचार केला जाईल. याशिवाय, पक्ष राज्यसभा सदस्यांसाठी मुदतीची मर्यादा निश्चित करण्याबाबतही गांभीर्याने विचार करण्याची शक्यता आहे.
Congress Chintan Shibir: २०२४ लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी; तरुणांना संधी, नेत्यांच्या राज्यसभा कार्यकाळाची मर्यादा यावर होणार चर्चा!
राजस्थानमधील उदयपूरमध्ये आजपासून काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात होत आहे. या शिबिरात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2022 at 10:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Age cap rs term limit on congress table in chintan shibir rmt