आग्रामध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे. आग्रा येथील होम स्टे येथे गेल्या दीड वर्षांपासून काम करत असलेल्या २५ वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. तसंच, तिला दारू पाजून तिच्या डोक्यावर बाटलीही फोडली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह पाचजणांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडितेचा एक अश्लील व्हिडीओ काढण्यात आला होता. हा व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल केलं जात होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी रात्री पाच जणांनी तिला दारू पिण्यास भाग पाडले. तसंच, तिच्या डोक्यावर बाटली फोडली. या दरम्यानचा तिचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. यामध्ये ती मदतीची याचना करत असून एक पुरुष तिला खोलीत ओढून घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा >> पर्यावरण चळवळीच्या माध्यमातून राजकीय भाषण? ग्रेटा थनबर्गच्या हातातील माईक हिसकावला, ‘त्या’ घटनेने जगभर खळबळ!

बलात्कार झाल्यानंतर महिलेने पोलिसांशी संपर्क साधून घडला प्रकार कथन केला. त्यानतंर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) अर्चना सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “या घटनेनंतर चार पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही महिला दीड वर्षांपासून होमस्टेची कर्मचारी होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार , जितेंद्र राठोड, रवी राठोड, मनीष कुमार आणि देवकिशोर अशी अटक आरोपींची नावे आहेत.

“शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आम्हाला पीडितेचा फोन आला. आम्ही होमस्टेवर धाव घेतली आणि आरोपींवर कारवाई केली. पीडितेचे वय सुमारे २५ वर्षे आहे आणि ती होमस्टेवर काम करते”, बसई पोलीस चौकीचे प्रभारी मोहित शर्मा यांनी पीटीआयला सांगितले .

आयपीसी कलम ३७६ (बलात्कार), ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३२३ (स्वेच्छेने दुखापत करणे), इतर संबंधित कलमांसह आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्याच्या कलम ७ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, होम स्टे हे हॉटेललही सील करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agra homestay employee gang raped alleged video of her crying for help surfaces sgk