ऑगस्टावेस्टलॅंडकडून हेलिकॉप्टर खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप होत असताना, या प्रकरणी तपासात सर्व मदत करण्याचे आश्वासन ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना दिले. भारत दौऱयावर आलेले कॅमेरून यांनी डॉ. सिंग यांची भेट घेतली.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १२ हेलिकॉप्टर खरेदीच्या सुमारे ३६०० कोटी रुपयांच्या व्यवहारात लाचखोरी झाल्याचे इटलीमध्ये झालेल्या तपासात दिसून आले. माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यावरदेखील लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. या प्रकरणी भारत खूप गंभीर असल्याचे डॉ. सिंग यांनी कॅमेरून यांना सांगितले आणि सर्वोतोपरी मदत करण्याची मागणी केली.
भारताने ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीला नोटीस बजावून २२ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास व कराराच्या शर्थींचा भंग केला आहे का, याचाही खुलासा करण्यास सांगितले आहे, असे डॉ. सिंग म्हणाले. तपासात आमचे सरकार भारताला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन कॅमेरून यांनी डॉ. सिंग यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा