‘ऑगस्टा वेस्टलँड‘ प्रकरणी महत्त्वाची कागदपत्रे बुधवारी संसदेत सादर करण्यात येतील असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. ऑगस्टा वेस्टलँडला मेक इन इंडिया, संरक्षण सामग्री प्रदर्शनात का सहभागी करुन घेतले ? असा प्रश्न काँग्रेसने केंद्र सरकारला विचारला होता. त्यास उत्तर देण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर येत्या ४ मे ला ऑगस्टा वेस्टलँड कराराची कागदपत्रे संसदेसमोर ठेवणार आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पर्रिकर म्हणाले की, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील सत्य आणि सविस्तर घटनाक्रम मांडणारे दस्तावेज मी येत्या ४ मे रोजी संसदेसमोर ठेवणार आहे. मुळात या व्यवहाराला मंजुरी कशी मिळाली आणि एखाद्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या हेतुपूर्वक प्रयत्नांबद्दल तत्कालीन सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे पर्रिकर यांनी सांगितले.
ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या AW१०१ व्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार झाला असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी/दलालांनी आपली हेलिकॉप्टर विकली जावीत म्हणून भारतातील उच्चपदस्थांना लाच दिल्याचे मिलान उच्च न्यायालयाने ८ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या आपल्या २२५ पानी न्यायपत्रात म्हटले होते. लाच घेणाऱ्या भारतीयांमध्ये केवळ माजी हवाईदल प्रमुख एस पी त्यागी यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख असला तरी या न्यायपत्राला जोडलेल्या पुरवणी कागदपत्रांत (annexure) कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावांचा उल्लेख असल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये भूकंप झाला होता.
ऑगस्टा वेस्टलँड कराराची कागदपत्रे संसदेत मांडणार- पर्रिकर
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर येत्या ४ मे ला ऑगस्टा वेस्टलँड कराराची कागदपत्रे संसदेसमोर ठेवणार आहेत.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:
First published on: 01-05-2016 at 15:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agustawestland documents to be placed before parliament on may 4 says parrikar