Omar Abdullah on Afzal Guru hanging: २००१ साली संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफझल गुरूच्या फाशीबाबत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान केले आहे. अफझल गुरूला फाशी देऊन काहीच साध्य झाले नाही. जम्मू-काश्मीरच्या हातात असते तर आम्ही या फाशीला कधीही मान्यता दिली नसती, असे धक्कादायक विधान ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. यामुळे आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता हा मुद्दा आता चर्चेत आला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर सरकारचा आणि अफझल गुरूच्या फाशीचा काहीही संबंध नव्हता. इतरवेळी फाशी देताना त्या त्या राज्य सरकारची परवानगी घेतली जाते. अफझल गुरूला फाशी देऊन कोणताही हेतू साध्य झालेला नाही.

Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Ajit Pawar on Mahavikas Aghadi MLA's Oath as a Maharashtra Legislative assembly Member
“मविआ आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा…”, अजित पवारांचा इशारा
Abu Asim Azmi
Abu Azmi : “कोण विरोधक? त्यांनी आम्हाला…”; अबू आझमींचे मविआतून बाहेर पडण्याचे संकेत? आमदारकीची शपथही घेतली
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
Arif Mohammed Khan
Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचं भगवद्गीतेबद्दल मोठं विधान; म्हणाले, “हा भारताचा…”

हे वाचा >> जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शाह यांचं कलम ३७० बाबत मोठं विधान; म्हणाले…

आपल्या भूमिकेचे समर्थन करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मी मृत्यूदंडाच्या शिक्षेच्याच विरोधात आहे. तसेच मी न्यायालयाच्या अयोग्यतेवर विश्वास ठेवत नाही. तसेच भारत किंवा भारताबाहेरील देशांमधील पुराव्यांनी हे वेळोवेळी दाखवून दिले आहे की, एखाद्या व्यक्तीला फाशी दिल्यानंतर आपण चुकीचे होतो, हे सिद्ध झालेले आहे.

ओमर अब्दुल्ला यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे नेते साजीद युसुफ म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीने अफझल गुरूला फाशी देणे गरजेचे होते.

हे ही वाचा >> J&K Assembly Election 2024: वडिलांची हत्या, स्वत:वर १५ वेळा जीवघेणा हल्ला, पक्षाची पाचव्यांदा उमेदवारी; कोण आहेत नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवार सकिना इटू?

तर नॅशनल कॉन्फरन्सशी आघाडी करून जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस पक्षाने मात्र ओमर अब्दुल्ला यांच्या विधानावरून स्वतःला बाजूला करत अंतर राखले आहे. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, या विषयाची आपण आता का चर्चा करत आहोत? ही निवडणुकीची वेळ आहे. नेते प्रतिक्रिया देत असतात. पण मला यावर भाष्य करण्यासारखे काही वाटत नाही.

जम्मू काश्मीरमधील निवडणूक कार्यक्रम

जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. १८ सप्टेंबरला पहिला टप्पा, २५ सप्टेंबरला दुसरा टप्पा, तर १ ऑक्टोबरला तिसरा टप्पा होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेसह निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

निवडणुकीचा कार्यक्रमटप्पा १टप्पा २टप्पा ३
अधिसूचना निघणार२० ऑगस्ट २०२४२९ ऑगस्ट २०२४५ सप्टेंबर २०२४
उमेदवार अर्ज भरण्याची अंतिम मुदत२७ ऑगस्ट २०२४५ सप्टेंबर २०२४१२ सप्टेंबर २०२४
नामनिर्देशनपत्रांची छाननी२८ ऑगस्ट २०२४६ सप्टेंबर २०२४१३ सप्टेंबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत३० ऑगस्ट २०२४९ सप्टेंबर २०२४१७ सप्टेंबर २०२४
मतदान१८ सप्टेंबर २०२४२५ सप्टेंबर २०२४१ ऑक्टोबर २०२४
मतमोजणी प्रक्रिया८ ऑक्टोबर २०२४८ ऑक्टोबर८ ऑक्टोबर

संसदेवर भीषण दहशतवादी हल्ला

१३ डिसेंबर २००१ रोजी सकाळी ११.४० वाजता पाच दहशतवादी जुन्या संसदेच्या आवारात घुसले. गृहमंत्र्यांचा स्टिकर लावलेल्या गाडीमध्ये हे पाचही जण संसदेच्या आवारात आले. पण सुरक्षा रक्षकांना सदर गाडीबाबत संशय आल्यानंतर गाडीला मागे जाण्यास सांगितले गेले. यामुळे दहशतवाद्यांनी गाडीतून बाहेर पडत अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे संसदेचा आपत्कालीन अलार्म वाजविला गेला आणि संसद सभागृहात जाणारे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. त्यावेळी संसदेत शंभरहून अधिक खासदार, मंत्री उपस्थित होते.

आणखी वाचा >> Rahul Gandhi Speech: जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत येण्याचा राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास, भाषणातून केंद्रावर केली टीका

जवळपास ३० मिनिटे गोळीबार सुरू होता. या चकमकीत पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात नऊ लोक शहीद झाले. त्यामध्ये दिल्ली पोलिस दलातील पाच जणांचा समावेश होता. केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक महिला, संसदेतील दोन कर्मचारी आणि एका पत्रकाराचा समावेश होता. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफजल गुरूला अटक करण्यात आली होती.

२६ सप्टेंबर २००६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरुला फाशी देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर ९ फेब्रुवारी २०१३ साली त्याला फाशी देण्यात आली. याआधी अफजल गुरुने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला होता. मात्र तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हा दयेचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. त्याच्यावर तिहार तुरुंगातच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

Story img Loader