बिहारमधील पाटणा शहर लागोपाठ झालेल्या सहा बॉम्बस्फोटांनी हादरल्याचे वृत्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील पाच बॉम्बस्फोट नरेंद्र मोदींच्या मेळाव्याच्या ठिकाणी झाले. या स्फोटांत पाचजण मृत्युमुखी पडले, तर साठहून अधिकजण जखमी झाले आहेत. हे सर्व बॉम्बस्फोट कमी तीव्रतेचे होते.
पाटणा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० च्या शौचालयात सकाळी पहिला बॉम्बस्फोट झाला होता. यात एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर अवघ्या तासाभराच्या अंतरानंतर गांधी मैदानात अवघ्या १० मिनीटात ५ बॉम्बस्फोट झाले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या बॉम्बस्फोट मालिकेचा बिहार सरकारकडून अहवाल मागितला आहे. या स्फोटाच्या तपासात बिहार पोलिसांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथकही पाठविण्यात आले आहे.
पाटणा साखळी बॉम्बस्फोटात पाच ठार
बिहारमधील पाटणा शहर लागोपाठ झालेल्या सहा बॉम्बस्फोटांनी हादरल्याचे वृत्त आहे.
First published on: 27-10-2013 at 11:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahead of narendra modis hunkar rally bomb blast at patna railway station