राजस्थानच्या दौसा येथे पोलिसांनी ६५ डेटोनेटर, जवळपास १,००० किलो स्फोटकं आणि ३६० जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली ४० पोती जप्त केली आहेत. यांचा वापर स्फोट घडवून आणण्यासाठी केला जातो. एका जिलेटिन कांडीचं वजन जवळपास २.७८ किलो इतकं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींच्या हस्ते एक्सप्रेसवेचं उद्घाटन होणार आहे. या दौऱ्यापूर्वी स्थानिक पोलीस सुरक्षेचा आढवा घेत होते. याचदरम्यान, पोलिसांनी दौसा जिल्ह्यातील खान भंकरी रोडजवळ स्फोटके घेऊन जाणाऱ्या व्हॅनसह एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.
या घटनेची माहिती देताना दौसा पोलीस अधीक्षक संजीव नैन म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित दौऱ्याआधी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. पोलिसांना एका खबऱ्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांनी भरलेल्या एका व्हॅनची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने खान भंकरी रोडवर बंदोबस्त केला आणि येथे एक पिकअप व्हॅन पकडली. डेटोनेटर, कनेक्टिंग तारा आणि इतर स्फोटकांनी भरलेल्या ४० पोत्यांसह ही व्हॅन जप्त करण्यात आली आहेत. तसेच या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक देखील केली आहे.
पिकअप चालकाकडे कोणतीही कागदपत्रं नव्हती
पोलिसांनी माहिती दिली आहे की, “पिकअप चालक राजेश मीणा याच्याकडे चालक परवाना आणि परमिटची मागणी करण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे ही कागदपत्रं नव्हती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या व्हॅनमध्ये तज्ज्ञ ब्लास्टर आणि बिल बाउचर मिळालं नाही. स्फोटकांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.”
हे ही वाचा >> एकटा सर्वांना पुरून उरलो!, राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांचे विरोधकांना आव्हान
स्फ्टोकं खोदकामासाठी घेऊन जात होतो : आरोपी
याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचं नावं राजेश मीणा असं असून तो व्यास मोहल्ला येथील रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, ही स्फोटकं तो खोदकामासाठी घेऊन जात होता.