एपी, रफा (गाझा पट्टी)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हमास’च्या हल्ल्यानंतर बंद केलेली इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवडय़ांनंतर शनिवारी खुली केली. त्यामुळे युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक अशा मदत सामुग्रीची वाहने गाझा पट्टीत दाखल झाली. तर सुमारे तीन हजार टन मदत साहित्याची आणखी २०० वाहने इजिप्तची सीमा ओलांडून गाझाकडे निघाली होती. मदत सामुग्रीच्या २० वाहनांना प्रथम इजिप्त सीमेवरून इस्रायलने वेढा दिलेल्या गाझा पट्टीत प्रवेश देण्यात आला असून या वाहनांमध्ये जीवरक्षक साहित्याचा समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे ही मदत सामुग्री गाझामधील मानवी संकटाच्या तीव्रतेच्या तुलनेत तुटपुंजी असल्याचे मदत पथकांतील स्वयंसेवकांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या प्रमुख सिंडी मॅक्केन यांनी, गाझामध्ये हाहाकार चालू असल्याचे सांगितले. ‘‘आम्हाला पुष्कळ मदत साहित्याची गरज असून त्याचा पुरवठा अखंडीत होणे आवश्यक आहे. गाझामध्ये युद्धापूर्वी दररोज सुमारे ४० ट्रक येत होते,’’ असेही मॅक्केन यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, या मदत सामग्रीमध्ये औषधे आणि मर्यादित प्रमाणात अन्नपदार्थाचा समावेश आहे, इंधनाचा नाही, अशी प्रतिक्रिया ‘हमास’ने व्यक्त केली आहे. ‘गाझा’तील मानवतेवरील संकट निवारणासाठी ही मदत सामुग्री मर्यादित असून साहित्याचा पुरवठा २४ तास होण्यासाठी सुरक्षा मार्गिका तयार करण्यात यावी, अशी मागणी ‘हमास’द्वारे चालवल्या जाणाऱ्या गाझा सरकारने केली आहे.      

हेही वाचा >>>गरबा खेळताना २४ तासांत १० जणांचा मृत्यू, चिंताजनक कारण आलं समोर

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांची इस्रायल भेट आणि काही मध्यस्थांच्या आठवडाभराहून सुरू असलेल्या मुत्सद्देगिरीनंतर गाझा-इजिप्त सीमा इस्रायलने खुली केली आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या सुमारे २०० लोकांची सुखरूप सुटका केल्याशिवाय कुठलीही मदतसामुग्री गाझामध्ये येऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका इस्रायलने घेतली होती.दरम्यान, मदत सामुग्रीच्या वाहनांनी शनिवारी गाझाचे मुख्य द्वार ओलांडले, तेव्हा सीमेच्या इजिप्तकडील बाजूला असलेल्या मदत पथकातील स्वयंसेवकांनी टाळय़ांचा कडकडाट केला आणि घोषणाही दिल्या. 

सुमारे तीन हजार टन मदतसामुग्री घेऊन आलेले आणि गेले अनेक दिवस सीमेजवळ उभे असलेले दोनशेहून अधिक ट्रक शनिवारी गाझाच्या दिशेने निघाले होते. सध्याच्या  युद्धग्रस्त गाझातून सुटका करून घेण्यासाठी हजारो नागरिक इजिप्तमध्ये जाण्याच्या प्रतीक्षेत सीमेवर आहेत.

गाझामध्ये २३ लाख पॅलेस्टिनी रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी निम्म्यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले आहे. उर्वरित लोक अन्नधान्य पुरवून खात असून अशुद्ध पाणी पीऊन दिवस ढकलत आहेत. तर गाझातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सामग्रीचा आणि जनित्रांसाठी इंधनाचा तुटवडा असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>पॅलेस्टिनी मदतीच्या प्रतीक्षेत;गाझावर बॉम्बवर्षांव,लेबनॉनजवळचे गाव रिकामे

हमास’प्रणित सरकारची मागणी

मदत सामुग्रीमध्ये औषधे आणि मर्यादित प्रमाणात अन्नपदार्थाचा समावेश आहे, इंधनाचा नाही. ‘गाझा’तील मानवतेवरील संकट निवारणासाठी ती तुटपुंजी आहे. मदतीचा पुरवठा २४ तास होण्यासाठी सुरक्षा मार्गिका तयार करण्यात यावी, अशी मागणी हमासप्रणीत गाझा सरकारने केली आहे.

बॉम्बहल्ले चालूच

इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई बाम्ब हल्ले चालूच ठेवले असले तरी पॅलेस्टाईनमधून इस्रायलवर होणारा क्षेपणास्त्रांचा मारा रोखणे त्याला शक्य झालेले नाही. ‘हमास’ने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा चालूच ठेवला आहे.

गाझामध्ये मोठय़ा प्रमाणात मदत सामुग्रीचा अखंड पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. गाझामध्ये युद्धापूर्वी दररोज सुमारे ४० ट्रक येत होते. त्यामुळे आताची मदत अपुरी आहे. – सिंडी मॅक्केन, प्रमुख, संयुक्त राष्ट्रांचा जागतिक अन्न कार्यक्रम

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aid flows into gaza from the border with egypt closed by israel amy
Show comments