२००२ मध्ये गुजरातमध्ये दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर राज्यात कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित झाली, असं विधान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा एमआयएचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी समाचार घेतला आहे. “बिल्किसच्या बलात्काऱ्यांना सोडलं जाईल, बिल्किसच्या तीन वर्षांच्या मुलीचा खून करणाऱ्यांना सोडलं जाईल, बिल्किसच्या आईच्या मारेकऱ्यांना सोडलं जाईल, हा धडा तुम्ही शिकवला आहे. एहसान जाफरींचा खून केला जाईल, हाही धडा तुम्हीच शिकवला आहे. तुम्ही शिकवलेला कोणकोणता धडा आम्ही लक्षात ठेवायचा?”, असा संतप्त सवाल ओवैसी यांनी अहमदाबादेतील सभेत विचारला आहे.

“जेव्हा पीडितांना न्याय मिळतो, तेव्हाच शांतता प्रस्थापित होते. सत्ता एक दिवस सर्वांकडून हिसकावून घेतली जाते. सत्तेच्या नशेत गृहमंत्री धडा शिकवल्याची भाषा करतात, पण जेव्हा दिल्लीत जातीय दंगली भडकल्या, तेव्ही तुम्ही कोणता धडा शिकवलात?”, असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

२००२ साली दंगेखोरांना ‘धडा शिकवला’; गुजरातच्या प्रचारसभेत अमित शहांचे विधान

काय म्हणाले आहेत अमित शाह?

“गुजरातमध्ये पूर्वी झालेल्या जातीय दंगलींमध्ये समाजकंटकांचा सहभाग होता आणि काँग्रेसमुळे ही समस्या बळावली होती. मात्र, २००२ मध्ये दंगलखोरांना आम्ही धडा शिकवल्यानंतर गुन्हेगारांनी कारवाया थांबवल्या आणि भाजपाने गुजरातमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित केली, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केले. गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील मधुधामध्ये आयोजित प्रचार सभेत शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Mumbai 26/11 Terror Attack: हल्ल्याच्या आठवडाभर आधीच नौदल प्रमुखांनी सांगितलं होतं, ‘सागरी मार्गानेच…!’

“गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात वारंवार जातीय दंगली झाल्या होत्या. काँग्रेस पक्ष विविध गट आणि जातींमधील लोकांना एकमेकांविरोधात उभे करत होता. काँग्रेसने दंगलींच्या माध्यमातून ‘व्होट बँक’ मजबूत केली होती. तसेच समाजातील एका मोठ्या वर्गावर अन्याय केला होता”, असा आरोप या सभेत शाह यांनी केला आहे.

Story img Loader