Kuwait Fire : कुवेतच्या मंगफ भागातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४९ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ४५ जण भारतीय असल्याचे समजते. या ४५ जणांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी कुवेतहून विमान रवाना झालं आहे. केंद्रीय मंत्री कीर्ती वधन सिंग यांनी यासंदर्भातील माहिती दिली. हे विमान केरळच्या कोची इथे उतरणार आहे.

आगीत जखमी झालेल्या भारतीयांच्या मदतीवर देखरेख करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव लवकरात लवकर परत मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग कुवेतला पोहोचले होते. तेथे सिंग यांनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सांगितले की अल-याह्या यांनी वैद्यकीय सेवा, मृतदेह त्वरित परत आणणे आणि घटनेच्या तपासासह संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. दूतावासाने समाजमाध्यमांवर म्हटले आहे की, ‘परराष्ट्र मंत्री याह्या यांनी या दु:खद घटनेबद्दल शोक व्यक्त केला. राज्यमंत्र्यांनी सर्व संबंधित कुवेती अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले.’ सिंग यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटललाही भेट दिली. तिथे सात जखमी भारतीयांना दाखल केले आहेत. तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी रात्री एक निवेदन जारी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना ‘दु:खद’ असल्याचे म्हटले.

Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

हेही वाचा >> कुवेत आग दुर्घटना: मृत्युमुखी पडलेल्यांची डीएनए चाचणी, पार्थिव आणण्यासाठी हवाई दलाचे विमान सज्ज

हे विमान कुवेतहून कोचीसाठी निघाले आहे. विमान उतरणार असलेल्या कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलीस आणि रुग्णवाहिकांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. दक्षिणेकडील मंगफ शहरात १९६ स्थलांतरित कामगार राहत असलेल्या सात मजली इमारतीला बुधवारी लागलेल्या आगीत किमान ४९ परदेशी कामगारांचा मृत्यू झाला आणि ५० जण जखमी झाले. ही भीषण आग इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. तर, एका निवेदनात दलाने म्हटले आहे की काल ज्या इमारतीला आग लागली त्या घटनास्थळाची आणि इमारतीची क्षेत्रीय तपासणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

मृतांची ओळख पटली

मंगफ शहरात परदेशी कामगारांच्या निवासस्थानाच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीय आणि तीन फिलिपिनो नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटवली आहे, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून काम करणारे शेख फहाद अल-युसूफ अल-सबाह म्हणाले की, अधिकाऱ्यांनी ४८ मृतदेहांची ओळख पटवली आहे, त्यापैकी ४५ भारतीय आणि तीन फिलिपिनो नागरिकांचे आहेत. उर्वरित एका मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कुवेतच्या सरकारी वकिलाने या घटनेचा तपास सुरू केला आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.