चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून भविष्यात निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने आपली सज्जता वाढविली आहे. त्यामुळे या दोन्ही देशांकडून एकाच वेळी आव्हान निर्माण झाले, तर त्याचा खंबीर मुकाबला करण्यासाठी हवाई दल सज्ज झाले आहे. या संदर्भात गेल्या दोन-तीन आठवडय़ांमध्ये हवाई दलाच्या यंत्रणांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये ४०० हून अधिक लढाऊ जेट विमानांचा सहभाग होता, असे भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी येथे सांगितले. गेल्या १८ मार्च रोजी विमानांचा सराव सुरू झाला. त्यावेळी पूर्व आणि पाश्चिमेकडील आघाडीवरून एकाच वेळी होणाऱ्या संभाव्य हल्ल्याची पाश्र्वभूमी करण्यात आली होती. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपली लढाऊ विमाने पाकिस्तानी सीमेवरून पूर्वेकडील आघाडीवर यशस्वीरीत्या वळविली. लढाऊ विमाने सुखरूपपणे तळावर उतरावीत यासाठी ईशान्येकडे अलीकडेच अत्याधुनिक अशी यंत्रणा उभारण्यात आली असून, तेथेच लढाऊ विमाने उतरविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा