प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये अडकलेल्या काश्मिरी नागरिकांसाठी हवाई दलाने   संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. श्रीनगर ते कारगिलदरम्यान अडकलेल्या १०६ नागरिकांची हवाई दलाने सुटका केली.
काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार बर्फवृष्टी व भूस्खलनामुळे अनेक भागांचा देशाशी संपर्क तुटला होता. कारगिल, गुरेझ तसेच लेह-श्रीनगर महामार्गानजीकच्या परिसरात अडकलेल्या नागरिकांची हवाई दलाने सुटका केली. त्यातील ६७ नागरिक हे कारगिल भागात अडकले होते.

Story img Loader