Air Hostess Arrested With 1 kg Gold in Rectum: अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या क्रू सिनेमात पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी तीन हवाई सुंदरी तस्करी करणाऱ्या गटाचा कसा भाग होतात हे कथानक दाखवण्यात आले होते. सोन्याची तस्करी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्याचे या सिनेमात पाहायला मिळाले. याच सिनेमाची रिअल लाईफ कहाणी सध्या केरळमध्ये घडल्याचे वृत्त समोर येत आहे.

केरळमध्ये एका हवाई सुंदरीने आपल्या प्रायव्हेट पार्ट (गुदाशयात) १ किलोभर सोनं लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या सूत्रांच्या हवाल्याने एक्सस्प्रेसने फायनान्शियल दिलेल्या माहितीनुसार डीआरआय कोचीनने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI – कन्नूर) अधिकाऱ्यांनी २८ मे रोजी मस्कतहून कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एअर होस्टेसला रोखले, तिच्याकडे हे लपवलेले सोने आढळून आले.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?

हे ही वाचा<< Pune Porshe Car Accident: मुंबई-पुणे एक्सस्प्रेसवेवर गाडीच्या मागे दिसली अनोखी सूचना; लोक म्हणतात, “पुणेकरांचा संताप.. “

पीटीआयने सांगितल्यानुसार, या एअर होस्टेसकडे तब्बल ९६० ग्रॅम तस्करीचे सोने कंपाऊंड स्वरूपात आढळले होते. चौकशीनंतर तिला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर कन्नूर येथील महिला कारागृहात तिची १४ दिवसांसाठी रवानगी करण्यात आली. सूत्रानुसार, गुदाशयात सोने लपवून तस्करी करताना एअरलाइन क्रू मेंबरला पकडण्यात आल्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी अंतर्वस्त्रात किंवा सामनामध्ये सोने लपवून नेण्याचे प्रकार घडले आहेत पण अशाप्रकारे प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवून तस्करी करण्याचा प्रकार सर्वांनाच थक्क करणारा आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू झाला असून, आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून तिने यापूर्वी अनेकदा सोन्याची तस्करी केल्याचे दिसून येते. तस्करी करणाऱ्या टोळीमध्ये केरळमधील व्यक्तींचाही सहभाग असल्याचे तपासात दिसून आले आहे.

हे ही वाचा<< “४६ लाख कुटुंबाची वीज सबसिडी बंद, फाईल अजून..”, ऊर्जा मंत्र्यांच्या Video मुळे खळबळ, जनतेचा संताप पण मूळ मुद्दा काय?

दोन महिन्यांपूर्वी म्हणजे साधारण एप्रिल महिन्यात सुद्धा असाच एक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला होता. सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दोन परदेशी महिलांसह तिघांना साडेतीन किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. तब्बल दोन कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी करण्यासाठी दोन परदेशी महिलांनी शौचालयामध्ये सोन्याची भुकटी लपून ठेवली होती.

Story img Loader