Air India Crew लंडन येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये एअर इंडियातल्या एका महिला सदस्याला ( Air India Crew ) मारहाण करण्यात आली. तिच्याशी गैरवर्तन आणि तिला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आम्ही स्थानिक पोलिसां संपर्क केला आहे असं एअर इंडियाने म्हटलं आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लंडनमध्ये हिथ्रोमध्ये असलेल्या रेडिसन रेड या हॉटेलमध्ये एअर इंडियाच्या महिला क्रू मेंबरला ( Air India Crew ) मारहाण झाली आहे. या हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत स्टाफने चिंता व्यक्त केली होती. अशात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार महिला क्रू मेंबर तिच्या रुममध्ये झोपली होती. त्यावेळी एक माणूस रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास तिच्या खोलीत शिरला. त्यावेळी या महिला क्रू मेंबरला जाग आली. त्यावेळी त्या माणसाला पाहून तिने आरडाओरड सुरु केली. ज्यानंतर तिच्या खोलीत घुसलेल्या हल्लेखोराने कपडे अडकवायच्या हँगरने या क्रू मेंबरला ( Air India Crew ) मारहाण केली आणि तिचे केस ओढून तिला फरफटत नेलं. ही घटना घडत असताना सदर महिला ओरडत होती. तसंच ही महिला खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पण खोलीत आलेला तो माणूस तिला बदडत होता. आरडाओरड ऐकून इतर लोक धावले त्यांनी या माणसाला पकडलं आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबरला ( Air India Crew ) रुग्णालयात दाखल केलं. गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे.

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
thrat note found bomb in plane from Goa to Mumbai alerting authorities mumbai print news sud 02
विमानांमध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी, गुन्हा दाखल
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
The video captured two women in a physical altercation.
दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral

हे पण वाचा- VIDEO: मुंबईत बेरोजगारीचं भीषण वास्तव; ३०० जागा अन् हजारो अर्जदार; एअर इंडियाच्या गेटजवळ चेंगराचेंगरी पाहून धडकी भरेल

एअर इंडियाचे प्रवक्ते काय म्हणाले?

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली की, “जी घटना आमच्या क्रू मेंबरसह झाली ती अतिशय वेदनादायी आहे. आम्ही आमच्या टीमच्या संपर्कात आहोत. एअर इंडिया यातील कायदेशीर गोष्टी तपासते आहे. तसंच पोलिसांशीही आम्ही संपर्क केला आहे. आमचे क्रू मेंबर आणि त्यांची सुरक्षा ही जबाबदारी सर्वोतोपरी आमची आहे” असं एअर इंडियाचे प्रवक्ते म्हणाले. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

मनिष तिवारी यांचा एअर इंडियावर आरोप

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सदर मारहाण झालेली महिला ( Air India Crew ) भारतात परतली आहे. सध्या तिचं समुपदेशन करण्यात येतं आहे. एअर इंडियाने त्यांच्या क्रू मेंबर्सची जबाबदारी घेतली पाहिजे. या घटनेत वरकरणी असं दिसतंय की जाणीवपूर्वक महिला क्रू मेंबरकडे दुर्लक्ष करण्यात आलं असा आरोप काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केला आहे.

Story img Loader