आजरपणाचे कारण देत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानकपणे संप पुकारला होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करत एअर इंडियाने २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. मात्र, आता कंपनीने दिलेल्या आश्वासनानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घेतला आहे. तसेच २५ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन एअर इंडिया प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा – व्हीलचेअरअभावी वृद्धाचा मृत्यू झाल्याप्रकरणी डीजीसीएचा एअर इंडियाला ३० लाखांचा दंड
दरम्यान, बुधवारी एअर इंडिया एक्सप्रेसच्या तब्बल ३०० कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण पुढे करत सामूहिक सुट्टी घेतली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी सुट्टी घेतल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली होती. तर काही विमानांचे उड्डाणे पुढे ढकलण्यात आले होती. या गोंधळामुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर या एअर इंडियाने या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करत २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा – भारतीय संस्कृतीची झलक दाखवत Air Indiaने सांगितल्या फ्लाईट सेफ्टी सुचना, Viral Video एकदी नक्की बघा
सामूहिक सुट्टी घेतलेल्या या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे काही मागण्या मांडल्या होत्या. त्यामध्ये वेतनवाढीसह आदी महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. मात्र, कंपनीने यावर गांभीर्याने विचार न केल्याने अचनाक ३०० कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण सांगत सुट्टी घेतली होती.
दरम्यान, गुरुवारी एअर इंडियाचे अधिकारी-कर्मचारी आणि मुख्य कामगार आयुक्त त्यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान एअर इंडियाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचे मान्य केले. तसेच सर्व बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावार घेण्याचेही आश्वासन दिले. त्यानंतर कर्माचाऱ्यांनी संप मागे घेणार असल्याचं सांगितले.