पीटीआय, नवी दिल्ली

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने, ( डीजीसीए ) टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडियाला प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकाने विमान चालवल्याप्रकरणी ९० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच एअर इंडियाचे संचालक पंकुल माथूर आणि प्रशिक्षण संचालक मनीष वासवडा यांना ६ लाख रुपये आणि ३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
high court order railway administration
गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू, पालकांना चार लाख रुपये नुकसाभरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड
police failed to prove, conviction , accused driving car allegation, mumbai,
बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप : आरोपीच गाडी चालवत असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, शिक्षा रद्द
nashik ang robbed an onion trader in bus parked at the Mela bus station
मेळा स्थानकात लूट, कांदा व्यापाऱ्याचे ११ लाख रुपये हिसकावले

एअर इंडियाने विनाप्रशिक्षित वैमानिकाकडून विमानाचे उड्डाण करवून घेतले. यात सुरक्षेचा कोणताही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे ही गंभीर घटना असल्याचे ‘डीजीसीए’ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगायचा इशारा संबंधित वैमानिकाला देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

विमान कंपनीने १० जुलै रोजी एक अहवाल सादर केल्यावर ही घटना निदर्शनास आली होती. त्यानंतर ‘डीजीसीए’कडून कंपनीचे कामकाज, कागदपत्रे आणि शेड्युलिंगची तपासणी केली. तपासाअंती यात गंभीर चुका आढळून आल्या होत्या. त्यानंतर २२ जुलै रोजी या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. या प्रकरणी संबंधितांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. त्यामुळे नियमानुसार पुढील कारवाई करून एअर इंडियाला ९० लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

Story img Loader