पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने, ( डीजीसीए ) टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडियाला प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकाने विमान चालवल्याप्रकरणी ९० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच एअर इंडियाचे संचालक पंकुल माथूर आणि प्रशिक्षण संचालक मनीष वासवडा यांना ६ लाख रुपये आणि ३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
एअर इंडियाने विनाप्रशिक्षित वैमानिकाकडून विमानाचे उड्डाण करवून घेतले. यात सुरक्षेचा कोणताही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे ही गंभीर घटना असल्याचे ‘डीजीसीए’ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगायचा इशारा संबंधित वैमानिकाला देण्यात आला आहे.
विमान कंपनीने १० जुलै रोजी एक अहवाल सादर केल्यावर ही घटना निदर्शनास आली होती. त्यानंतर ‘डीजीसीए’कडून कंपनीचे कामकाज, कागदपत्रे आणि शेड्युलिंगची तपासणी केली. तपासाअंती यात गंभीर चुका आढळून आल्या होत्या. त्यानंतर २२ जुलै रोजी या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. या प्रकरणी संबंधितांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. त्यामुळे नियमानुसार पुढील कारवाई करून एअर इंडियाला ९० लाखांचा दंड ठोठावण्यात आला.