न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने एका महिलेवर लघुशंका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेंगळुरू येथून अटक केली. शंकर मिश्रा असं आरोपीचं नाव आहे. तो दिल्ली पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही आणि वारंवार आपला जबाब बदलत आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मिश्रा सतत आपला जबाब बदलत आहे. तो तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे त्याने दिलेल्या माहितीची पुष्टी करण्यासाठी, आम्ही पीडित महिला, क्रू मेंबर्स आणि सह-प्रवाशांचे जबाब नोंदवून घेत आहोत.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kondhwa police station, women police beaten ,
कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
supplementary chargesheet in Kalyaninagar accident case and chargesheet against accused in blood sample tampering case
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुरवणी आरोपपत्र, रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपीविरुद्ध आरोपपत्र
Unnatural sexual assault with female lawyer by husband family and in laws
महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार… न्यायाधीश असलेला सासराही…
bhosri Balajinagar slum youth and accomplices ransacked womans house
पिंपरी : चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी महिलेच्या घरात घुसून तोडफोड

हेही वाचा- “जी नंगानाच करत फिरतेय, तिला…”, महिला आयोगाच्या नोटीशीनंतर चित्रा वाघ यांचा संताप

ते पुढे म्हणाले की, पीडित महिला प्रवाशी आरोपीच्या मागच्या सीटवर बसली होती. यावेळी आरोपीनं मागच्या बाजुला वळून महिलेच्या अंगावर लघुशंका केली. यावेळी पीडित महिलेशेजारी बसलेल्या अन्य एका प्रवाशाने आरोपीवर संताप व्यक्त केला. तसेच लघुशंका करण्यावरून त्याने आरोपीला खडसावलं. याप्रकरणी अधिक तपशील मिळवण्यासाठी आम्ही पीडित महिलेच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत एअर इंडियाच्या तीन क्रू मेंबर्सचे जबाब नोंदवले आहेत.

हेही वाचा- विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या तरुणाला कंपनीचा दणका, केली मोठी कारवाई

नेमकं प्रकरण काय?

आरोपी शंकर मिश्रा यांनी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका ७० वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. दिल्ली पोलिसांनी आरोपीला आज बेंगळुरू येथून अटक करून दिल्लीत आणलं आहे. दरम्यान, जबाब नोंदवत असताना आरोपी पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader