एअर इंडियाच्या विमानातही आता जयहिंदचा नारा दिला जाणार आहे. कारण, तसा आदेशच कंपनीने काढला असून विमान प्रवासादरम्यान, सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

एअर इंडियाच्या नव्या नियमावलीनुसार, प्रवासादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना विमानातील प्रत्येक जाहीर निवेदनानंतर थोडसं थांबून उत्साहात जयहिंदचा नारा देणं बंधनकारक असणार आहे. सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियामध्ये सध्या ३५०० कॅबिन क्रू आणि १२०० कॉकपिट क्रू मेंबर्स आहेत. या सर्वांसाठी याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यापूर्वी एअर इंडियात मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी असताना लोहानी यांनी २०१६ मध्येही असाच आदेश काढला होता.

Story img Loader