टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडिया कंपनीने दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रांसच्या एअरबस कंपन्यांसोबत करार करत ४७० विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पून्हा आणखी ३७० विमानं घेणार असल्याचे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगतिले आहे. यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात एकूण ८७० विमानं काही पुढील वर्षात दाखल होणार आहेत. एअर इंडियाचे वरिष्ठ वाणिजिक्य आणि रुपांतरण विभागाचे अधिकारी निपुण अग्रवाल यांनी बुधवारी लिंक्डिनवर लिहिलेल्या एका पोस्टमधून याचा खुलासा झाला आहे. तसेच एअर इंडियाच्या करारानंतर भारत आणि जगभरात या कराराचे कौतुक केले गेले, लोकांचे हे प्रेम आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असेही अग्रवाल म्हणाले.
हे वाचा >> टॉपलेस होत रशियन महिलेचा विमानात धिंगाणा; कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न, सिगारेट ओढण्याची मागणी आणि…
एअर इंडियाने मंगळवारी फ्रांसच्या एअरबसकडून २५० तर अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून २२० विमाने घेणार आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातलला सर्वात मोठा आणि ऐतिहासिक असा हा करार आहे. आता निपुण अग्रवाल यांनी सुचित केल्याप्रमाणे हा करार आणखी मोठा होणार आहे. कारण या ४७० विमानांच्या खरेदीमध्ये आणखी ३७० विमानांची भर पडणार आहे. त्यामुळे ऐकूण खरेदी करण्यात येणाऱ्या विमानांची संख्या ८४० होणार आहे.
जुन्या करारानुसार जे ४७० विमानं घेतली जाणार होती, त्यामध्ये पुढच्या दशकापर्यंत ३७० विमानांची वाढ करण्यात येणार आहे. त्याबरोबर विमानाच्या इंजिनाची देखभालीसाठी सीएफएम इंटरनॅशन रोल्स रोयस आणि जीई एरोस्पेस या कंपन्यांसोबत करार करण्यात आल्याची माहती अग्रवाल यांनी दिली. मात्र सर्व विमानांच्या आगमनाची तारीख अजून निश्चितपणे सांगण्यात आलेली नाही. एअरबसचे ए ३५० हे विमान याचवर्षी भारतात येईल. तर एअरबसच्या ए३२१ न्यूओस आणि इतर विमानांची डिलिव्हरी पुढील वर्षात मिळेल.
हे वाचा >> विश्लेषण: एअर इंडियाने कशी केली विक्रमी विमान खरेदी?
हे दोन्ही करारांची किंमत काय?
एअरबस आणि बोइंग या दोन्ही कंपन्यांशी केलेले हे करार सुमारे ८० अब्ज अमेरिकी डॉलरचे (६.४० लाख कोटी रुपये) आहेत. ‘एअरबस’सोबतचा करार सुमारे ४६ अब्ज अमेरिकी डॉलरचा आहे, तर बोइंगसोबतचा करार ३४ अब्ज डॉलरचा आहे. बोइंगकडून आणखी ७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय असल्याने या कंपनीसोबतचा करार ४५.९ अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच नवीन ३७० विमानांची किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही.