एअर मार्शल अरूप राहा यांची मंगळवारी हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. सध्याचे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल एनएके ब्राऊन ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर अरूप राहा हे पदभार स्वीकारतील. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे याबद्दल माहिती दिली.
५९ वर्षीय राहा यांना तीन वर्षे एअर चीफ मार्शल पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. अरूप राहा यांचा जन्म २६ डिसेंबर १९५४ रोजी झाला. १४ डिसेंबर १९७४ रोजी ते हवाई दलाच्या हवाई दलामध्ये रुजू झाले. ३९ वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी हवाई दलातील विविध वरिष्ठ पदांवर काम केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air marshal arup raha to be the next iaf chief
Show comments