येत्या काळात वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुर्मान पाच वर्षांनी कमी होण्याची शक्यता आहे. शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, “नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात लोक मोठ्या प्रमाणात प्रदुषित भागांमध्ये राहतात. तसेच, गेल्या काही वर्षात भारताच्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला असून हवेची गुणवत्ता लक्षणीय खराब झाली आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत हा दुसरा सर्वात प्रदूषित देश

वायू प्रदूषण हा भारतातील मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. दिल्ली हे भारतातील सर्वात जास्त प्रदुषित राज्य आहे. जागतिक स्तरावर भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश आहे. भारतात २०२० साली खराब हवेमुळे नागरिकांचे आयुर्मान ६.९ वर्षांनी कमी झाले. नेपाळचे (४.१ वर्षे), पाकिस्तान (३.८ वर्षे) आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोतील लोकांचे आयुष्य २.९ वर्षांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. ईपीआयचीच्या निष्कर्षांनुसार, शेजारील बांगलादेशने जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या पातळीवर हवेचा दर्जा सुधारल्यास तेथील सरासरी आयुर्मान ५.४ वर्षांनी वाढू शकते.

२०१३ पासून जगभरातील प्रदूषणात मोठी वाढ

ईपीआयसीच्या अहवालानुसार अतिसुक्ष्म असे कण बराच वेळ हवेत तरंगत राहतात आणि श्वासनलिकेद्वारे शरीरात जातात. त्यामुळे वेगवेगळे रोग होऊ शकतात. गेल्या दोन दशकांमध्ये जगभरातील कणसंबंधी पदार्थांच्या उर्त्सजनात मोठी ६१.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे २.१ वर्षांच्या सरासरी आयुर्मानात आणखी घट झाली आहे. २०१३ पासून जगभरातील प्रदूषणात सुमारे ४४% वाढ भारतात झाली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे ४०%, सध्याचे प्रदूषण स्तर कायम राहिल्यास, सरासरी ७.६ वर्षे आयुर्मान भारतीय गमवू शकतात. तसेच प्रदूषणाची पातळी कायम राहिल्यास लखनौच्या रहिवाशांचे आयुर्मान ९.५ वर्षे कमी होईल असेही संशोधनातून समोर आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution to reduce the life expectancy more than nine years epic research dpj