सिरियात राका येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात आयसिस नेत्यासह ११ जण ठार झाल्याची माहिती निरिक्षकांनी दिली आहे.
सिरियातील मानवाधिकार निरीक्षकांनी हवाई हल्ला करणाऱ्या राष्ट्राचे नाव सांगितले नसले तरी आयसिस नेता ठार झाल्याचे स्पष्ट केले आहे. फेरदाओस जिल्ह्य़ात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हा नेता मारला गेला, तर शहरातील इतर ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत १० जणांचा बळी गेला आहे. राका येथे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी सप्टेंबरपासून सातत्याने हवाई हल्ले करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सिरिया हवाई दल आणि रशियाच्या विमानांकडूनही अशा प्रकारे हल्ले करण्यात येत आहेत. रशियन प्रवासी विमान पाडल्याचा आयसिसवर आरोप करण्यात आल्यावर रशियाने आयसिसविरोधातील हल्ले थांबविले आहेत. या प्रांतात अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आयसिसचे ३२ दहशतवादी ठार झाले आहेत. जानेवारी २०१४ पासून या प्रांतावर आयसिसचे नियंत्रण आहे.

Story img Loader