पीटीआय, मुंबई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिगो’ या हवाई प्रवास वाहतूक कंपनीने सोमवारी ‘पॅरिस एअर शो’मध्ये ‘एअरबस’ या कंपनीकडे ‘ए३२०’ श्रेणीतल्या ५०० छोटय़ा विमानांची मागणी नोंदवली. ‘एअरबस’ या फ्रान्सच्या कंपनीकडे एवढी मोठी मागणी नोंदवणारी ‘इंडिगो’ ही पहिली कंपनी असल्याचे बोलले जाते.भारतीय विमान वाहतुकीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे, अशी भावना ‘इंडिगो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी व्यक्त केली. इंडिगोच्या मागणीत ‘ए३२०एनईओ’, ‘ए३२१एनईओ’ आणि ‘ए३२१एक्सएलआर’ या विमानांचा समावेश आहे. या मागणीचे आर्थिक तपशील मात्र ‘इंडिगो’ने जाहीर केले नाहीत.

‘पॅरिस एअर शो’मध्ये ‘इंडिगो’ आणि ‘एअरबस’ यांच्यात विमान खरेदी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. वाजवी दरात सेवा पुरवणाऱ्या ‘इंडिगो’ने १६ वर्षांपूर्वी प्रवासी वाहतूक सुरू केली होती. इंडिगोच्या यापूर्वीच्या ४८० विमानांच्या मागणीची अद्याप पूर्तता झालेली नाही. वर्षांच्या सुरुवातीला टाटा समूहाच्या मालकीच्या ‘एअर इंडिया’ने ‘एअरबस’ आणि ‘बोइंग’कडे ४७० विमानांची मागणी नोंदवली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air travel company indigo has placed a demand for aircrafts with airbus amy