एअर एशियाच्या विमानाचे जावाच्या समुद्रात पडलेले चार मोठे धातूचे भाग सापडले असल्याचे इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवामान खराब असल्याने मदतकार्य वेगाने करण्यात अडथळे येत आहेत. विमानाच्या डेटा रेकॉर्र्डसचा शोध घेण्यातही यश आलेले नाही. पांगकलान बन येथे सागराच्या तळाशी हे धातूचे पदार्थ सापडले असल्याचे पुनर्वसन संस्थेचे प्रमुख बाबांग सोलिस्टय़ो यांनी सांगितले.
ते म्हणाले की, एअर बस ए ३२० या विमानाचे ते चार भाग असून हे विमान गेल्या रविवारी १६२ प्रवाशांसह कोसळले होते. त्या भागात तेलाचे तवंगही दिसले आहेत त्याचबरोबर चार मोठे भागही सापडले आहेत. विमानाचा तो सर्वात मोठा भाग असून दूरसंदेशाने चालवल्या जाणाऱ्या उपकरणाच्या मदतीने त्याची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. एक धातूचा भाग ९ मीटर लांबीचा असून दुसरा ७ मीटर लांबीचा आहे. रात्री अकरा वाजता हे भाग सापडले असून शोधाच्या मुख्य ठिकाणी ते होते. शोध पथके सध्या दूरनियंत्रित उपकरणांचा वापर करीत असून विमानाच्या सांगाडय़ाची अगदी जवळून छायाचित्रे घेतली जात आहेत. त्यानंतर पाणबुडय़ांना तेथे पाठवले जाणार आहे.
एअर एशियाच्या विमानाचे चार मोठे तुकडे सापडले
एअर एशियाच्या विमानाचे जावाच्या समुद्रात पडलेले चार मोठे धातूचे भाग सापडले असल्याचे इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
First published on: 04-01-2015 at 08:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airasia qz8501 plane crash blamed on weather