कर्नाटकमधील बंगळुरू येथे आज देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील अनेक नेते उपस्थितीत होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधीही या बैठकीला उपस्थितीत होते. ही बैठक पार पडल्यानंतर सोनिया गांधी व राहुल गांधी परत येत असताना त्यांच्या विमानाला आपत्कालीन लँडिंग करावी लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विमानाचं आपत्कालीन लँडिग मध्य प्रदेशातील भोपळ विमानतळावर करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे हे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती भोपाळ पोलिसांनी दिली.

हेही वाचा- “ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध ‘INDIA’ आहे”, विरोधकांच्या बैठकीनंतर राहुल गांधींकडून निर्धार व्यक्त

विरोधी पक्षाच्या आजच्या बंगळुरू येथील बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. तसेच विरोधी पक्षाच्या आघाडीचं नामकरणंही करण्यात आलं आहे. या आघाडीला INDIA अर्थात Indian National Development Inclusive Alliance हे नाव दिलं असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं. यावेळी विविध राजकीय नेत्यांनी आपलं मतप्रदर्शन केलं.