What is Airport Malaria and Luggage Malaria : युरोपमध्ये एअरपोर्ट आणि लगेज मलेरियाची प्रकरणे वाढत आहेत. आरोग्यतज्ज्ञांनी हा धोका असल्याचं सांगितलं असून डासांमुळे परसरणाऱ्या रोगाचा प्रसार होऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Eurosurveillance मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात अशी प्रकरणं वाढत असल्याचं सिद्ध झालं आहे. संशोधकांनी २०१८ ते २०२२ दरम्यान १४५ प्रकरणांवर अभ्यास केला. यापैकी १०५ एअरपोर्ट मलेरिया आणि ३५ लगेज मलेरियाची प्रकरणे आढळून आली. उर्वरित आठ प्रकरणांसाठी अभ्यासक दोन प्रकरांमध्ये फरक करू शकले नाहीत.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Big Action on Illegal Bangladeshis Intruders in mumbai
मुंबईत बांगलादेशींचा सुळसुळाट? दहा दिवसांत ८१ अटकेत… इतके बांगलादेशी येतात कसे? त्यांना कागदपत्रे मिळतात कशी?
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
Toxic semen kill female mosquitoes australia
डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र

एअरपोर्ट आणि लगेज मलेरियामध्ये फरक काय?

दोन्ही प्रकारचे संक्रमण स्थानिक क्षेत्राबाहेर होते. जेव्हा एखादी व्यक्ती मलेरिया प्रवण प्रदेशातून विमानतळावर आली असेल आणि त्या प्रादूर्भावाने विमानतळावरील प्रवाशाला मलेरियाची लागण होते. तेव्हा त्याला एअरपोर्ट मलेरिया होतो. तर, लगेज मलेरियामध्ये सामानातून लपलेल्या डासांमुळे संसर्ग होतो.

अभ्यासानुसार, २००० पासून युरोपमध्ये विमानतळावरील मलेरियाची प्रकरणे ७.४ पट वाढली आहेत. तर हवामान बदल यामधील मुख्य कारण आहे. फ्रान्स (५२), बेल्जिअम (१९), जर्मनी (९) रुग्णे मलेरियाची सापडली.

एअरपोर्ट आणि लगेज मलेरियाची वाढ रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्जंतुकीकरण प्रक्रियेचे पालन करण्याचे आवाहन विमान कंपन्यांना देण्यात आले. प्रवासी केबिन, टॉयलेट आणि संपूर्ण विमानात किटकनाशकांची फवारणी करण्यासही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >> मलेरिया होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी अन् ॲडमिट होण्याचा धोका टाळा

मलेरिया का होतो?

गुरे, ढोरे तसेच पाळीव प्राणी पाण्याच्या डबक्यात बसतात, तसेच मोकळ्या हवेच्या ठिकाणी स्थानांतरित होतात. तसेच उन्हाळ्यात घरोघरी कुलर, वातानुकूलित यंत्र वापरले जाते. यासाठी पाण्याची साठवणूक केली जाते. याशिवायही विविध कारणांसाठी पाणी साठवून ठेवले जाते. पावसाळ्यातही विविध ठिकाणी पाण्याचे डबके साचते. या सर्व ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. हे डास साधारणत: रात्री चावा घेतात. यामुळेही हिवतापाची साथ पसरण्याचा धोका असतो. जुलै ते डिसेंबर या पावसाळ्यातील महिन्यांमध्ये याची शक्यता अधिक बळवते. दमट वातावरण या डासांकरिता पोषक ठरते. या आजारात थंडी वाजून ताप, घाम सुटणे व इतरही अनेक लक्षणे रुग्णांत दिसतात.

मलेरियाची लक्षणे खालील प्रमाणे

ताप आणि थंडी: थंडीसह उच्च ताप हे मलेरियाचे लक्षण आहे.

डोकेदुखी आणि स्नायू दुखणे: ही सामान्य लक्षणे आहेत, अनेकदा थकवा आणि अशक्तपणा येतो.

मळमळ आणि उलट्या: गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे देखील उद्भवू शकतात.

घाम येणे आणि भरपूर घाम येणे: तुमचे शरीर संसर्गाशी लढण्याचा प्रयत्न करत असताना तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो.

Story img Loader