जिओने टेलिकॉम क्षेत्रात येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ग्राहकांना मोफत डेटा आणि कॅशबॅक ऑफर देण्याची घोषणा केली आहे. आता जिओची प्रतिस्पर्धी एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवा पॅक सादर केला आहे. नवीन एअरटेल रिचार्जची किंमत ४१९ रूपये असून या पॅकमध्ये ग्राहकांना १.४ जीबी डेटा दररोज मिळेल. एअरटेल ग्राहकांना आधीपासूनच ३९९ रूपये आणि ४४८ रूपयाचा रिचार्ज पॅक देत आहे. या दोन्ही पॅकची किंमत क्रमश: ७० दिवस आणि ८२ दिवसांसाठी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४१९ रूपयाचा एअरटेल रिचार्ज पॅक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून घेता येईल. या पॅकची वैधता ७५ दिवस आहे. ग्राहकांना या पॅकमध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी कॉल (दररोज ३०० मिनिट आणि प्रत्येक आठवड्याला १००० मिनिट) मिळतात. ग्राहकांना या रिचार्ज पॅकमध्ये मोफत नॅशनल रोमिंग आणि १०० एसएमएस मिळतात. एअरटेल टीव्ही अॅपचे अॅक्सेसही या पॅकबरोबर मिळेल.

रिलायन्स जिओच्या ३४९ रूपयाच्या रिचार्जमध्ये १.५ जीबी डेटा मिळतो. या ७० दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या या पॅकमध्ये अमर्यादित व्हाइस कॉल आणि १०० एसएमएस दररोज मिळतात. त्याचबरोबर जिओ अॅप्सचे अॅक्सेसचाही मोफत लाभ घेता येईल. सध्या मिळत असलेल्या जिओ ऑफरअंतर्गत ३०० रूपये आणि त्याहून अधिकच्या रिचार्जवर ५० रूपये कॅशबॅक मिळेल. म्हणजे याची प्रभावी किंमत घटून २४९ होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel rs 419 recharge pack for 75 days launched jio
Show comments