बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘रेड’ चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री पुष्पा जोशी यांचे मंगळवारी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. पुष्पा यांनी ‘रेड’ चित्रपटात अभिनेता सौरभ शुक्लाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून भरघोस कौतुक करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांनी ‘फेवीक्विक’च्या जाहीरातीमध्ये देखील काम केले होते. या जाहिरातीनंतर त्या ‘स्वॅग वाली दादी’ म्हणून लोकप्रिय झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी पुष्पा त्यांच्या घरात पाय घसरुन पडल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘रेड’ चित्रपटाचे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी ट्विटरद्वारे या दु:खद घटनेची माहिती दिली आहे. राज कुमार गुप्ताने पुष्पा जोशी यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले, ‘पुष्पा जोशी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला फार दु:ख झाले. माझ्या ‘रेड’ चित्रपटात तुम्हाला भूमिका साकारताना पाहणे माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते.’ त्यानंतर अभिनेत्री काजोलने देखील पुष्पा यांचा व्हिडीओ शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgns raid co star passes away avb