दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत मंगळवारी अजय माकन यांनी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. माकन यांच्यावर दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक यंत्रणेचे प्रचारप्रमुख आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अशी दुहेरी जबाबदारी होती. मात्र, माकन यांना स्वत:च्या सदर बाजार या मतदारसंघातच मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. तर, काँग्रेसला या निवडणुकीत अवघी एकही जागा जिंकता आलेली नाही. मंगळवारी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालांमध्ये आपच्या रेट्यासमोर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची अक्षरश: पिछेहाट झालेली दिसली. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत आपला तब्बल ६०च्या वर जागांवर विजय मिळण्याची दाट शक्यता आहे. तर, निवडणुकीत आक्रमक प्रचार करणाऱ्या भाजपला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे, लागण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, अजय माकन यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला अवघी एक जागाही जिंकता आलेली नाही. त्यामुळे या लाजिरवाण्या पराभवाची जबाबदारी स्विकारत अजय माकन यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay maken resigns as congress general secretary
Show comments