गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अजित दोवल यांची तिसऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारकडून यासंदर्भातील नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहणारे अजित डोवाल हे देशातील पहिले अधिकार आहेत. यापूर्वी २०१४ आणि २०१९ साली त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार, अजित डोवाल यांना १० जूनपासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर असेपर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील, असं या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे. याशिवाय प्रमोद कुमार मिश्रा यांनी पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

हेही वाचा – “मुलीची अंतर्वस्त्रे काढणे, स्वतः नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही तर..”, राजस्थान हायकोर्टाने निर्णयात सांगितले बलात्काराचे तीन टप्पे

कोण आहेत अजित डोवाल?

अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी होते. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले. अजित डोवाल यांचे गुप्तचर यंत्रणेमधील काम वाखाणण्याजोगे होते. १९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

याशिवाय १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजवली होती. यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.