राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्याने फुट पडली आहे. त्यांचं हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं असून याप्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी खुद्द शरद पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते. दोन तास ही सुनावणी चालली. सुनावणी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केला असल्याचा दावाही सिंघवी यांनी केला आहे.

अभिषेक सिंघवी म्हणाले की, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन मुद्दे उपस्थित केले. पहिलं म्हणजे आमची बाजू ऐकून न घेता पक्षात वाद असल्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असू शकतो. त्यामुळे आधी आमची बाजू ऐकून घ्या आणि मगच निर्णय जाहीर करा, असं निवडणूक आयोगाला सांगितलं आहे.

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Cold Play online ticket sales black market mumbai High Court PIL
कोल्ड प्ले ऑनलाईन तिकीट विक्री काळाबाजार प्रकरण : मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
Mumbai Highcourt
Mumbai Highcourt : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

दुसरा मुद्दा नैसर्गिक न्यायाचा उपस्थित करण्यात आला आहे. आम्ही रिस्पॉडंट आहोत. त्यामुळे आम्ही उत्तर देणार आहोत”, असंही सिंघवी म्हणाले.

आमचीही बाजू ऐकून घेणार

“निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की आमचा हा विरोध प्राथमिक रुपात मानता येणार नाही. परंतु, आम्हाला आश्वस्त केलं आहे की याचिकाकर्त्याचा युक्तीवाद झाल्यानंतर आमचं म्हणणं ऐकलं जाईल. त्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेईल”, अशीही माहिती त्यांनी दिली.

काल्पनिक वाद निर्माण केला

“कोणतीही व्यक्ती, खोटे कागदपत्र सादर करून हे नाही सांगू शकत की वाद आहेत. काल्पनिक वाद निर्माण करून दोन गट दाखवू शकत नाही. काल्पनिक वादासंदर्भात आम्ही युक्तीवाद करू शकतो. हा मुद्दा प्राथमिक रुपात ठेवला आहे. नंतर आम्ही विस्ताराने हा मुद्दा मांडणार आहोत, असंही ते म्हणाले.

मृत व्यक्तींची कागदपत्र दाखवली

“मृत व्यक्तींची कागदपत्रे अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली. खोटी कागदपत्रे सादर करून अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. इतर पक्षातील बडा नेता आमच्या गटात असल्याचंही अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे. आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा शरद पवारच आहेत,” असं वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं.

पुढील सुनावणी सोमवारी

आज दोन तास सुनावणी झाल्यानंतर आता पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता सुनावणी होणार आहे.

शरद पवार गटाचा युक्तीवाद काय?

राज्य आणि बाहेरही पक्ष कुणाचा? सर्वांना माहिती आहे. अजित पवार गटाची पक्षाच्या विरोधात भूमिका आहे. अजित पवार गटाने पक्षाची भूमिका पाळली नाही. एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे आहे. २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा आहे. पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली. शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड पक्ष घटनेला धरून आहे. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शरद पवार यांनी घेतलेले निर्णय डावलता येत नाहीत. शरद पवारांचं नेतृत्व मान्य असं पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिलं आहे. निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, असा युक्तीवाद शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.

अजित पवार गटाचा युक्तीवाद काय?

विधानसभेचे ४२ आमदार, विधानपरिषदेचे ६ आमदार, नागालँडमधील ७ आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे प्रत्येकी एक खासदार अजित पवाग गटाकडे आहेत. अजित पवार यांची ३० जूनला बहुमतानं अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याबरोबर आहेत. विधानसभा, विधानपरिषदेचे अधिक संख्याबळ आमच्याकडे आहे. कोअर कमिटीतील सदस्यही आमच्याबरोबर आहेत. अनेक वर्षापासून पक्षांर्तंगत निवडणुका झाल्या नाहीत, असा युक्तीवाद अजित पवार गटाने केला आहे.

Story img Loader