नवी दिल्ली : शरद पवार घर चालवावे तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार करत होते. फक्त एक व्यक्ती राजकीय पक्ष चालवू शकत नाही. पक्षामध्ये लोकशाही उरली नव्हती, असा थेट आरोप अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आला. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, या वादावर सोमवारी केंद्राय निवडणूक आयोगासमोर झालेल्या युक्तिवादामध्ये अजित पवार गटाने शरद पवार यांना लक्ष्य केले.

अजित पवार गटाचा युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाला. शरद पवार गटाला कागदपत्रे सादर करण्याची चार वेळा संधी देण्यात आली होती. त्यामुळे नवी संधी देऊ नये, ही अजित पवार गटाची विनंती आयोगाने फेटाळली. ३० ऑक्टोबपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश आयोगाने शरद पवार गटाला दिले असून पुढील सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाची बाजू मांडतील.

Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Municipal Corporation pune will provide finance to 11 thousand students
महापालिका करणार ११ हजार विद्यार्थ्यांना सहाय्य, काय आहे कारण?
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…

हेही वाचा >>> राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगातील सुनावणी संपताच शरद पवार गटाचे वकील म्हणाले…

आमदार अपात्रतेवर शुक्रवारी सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात असून त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणाची १३ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

अजित पवार गटाचा युक्तिवाद

’राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आमच्याबरोबर 

’काँग्रेसच्या १९७२ मधील फुटीसंदर्भातील सादिक अली प्रकरणामध्ये संसदीय पक्षातील बहुमत ग्राह्य

’चुकीची कागदपत्रे दिल्याचा आरोप अमान्य

’कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे तपासण्याची मागणी ’निवडणूक न होताच शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

Story img Loader