पीटीआय, अजमेर (राजस्थान)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजमेरमधील प्रसिद्ध ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या जागी पूर्वी शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका राजस्थानमधील एका स्थानिक न्यायालयाने स्वीकारली आहे. न्यायालयाने बुधवारी दर्गा प्रशासनासह संबंधितांना नोटीस बजावली असून २० डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून हिंसा भडकली असतानाच आता अजमेर दर्ग्यावरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर पश्चिम दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायाधीश मनमोहन चंदेल यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. याबाबत माहिती देताना याचिकाकर्त्यांचे वकील योगेश सिरोजा म्हणाले, की दर्ग्याच्या जागी पूर्वी ‘संकट मोचन महादेव मंदिरा’ असल्याचा दावा करणारी याचिका सप्टेंबरमध्ये दाखल करण्यात आली होती. यावर बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने याचिका दाखल करून घेत दर्गा समिती, अल्पसंख्याक विभाग आणि पुरत्त्त्व विभागाला नोटीस बजावली.

हेही वाचा >>>Iskcon : “इस्कॉन ही कट्टरपंथी संघटना…”, बांगलादेश सरकारचे उत्तर; बंदीच्या मागणीवर उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

याचिकाकर्त्यांचा दावा

● अजमेरचे रहिवासी हरविलास शारदा यांच्या १९११ साली लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला

● शिवमंदिरात पूर्वी पूजा-जलाभिषेक होत असे

● दर्ग्याच्या तळघरात शिवमंदिराचा गाभारा

● दर्गा परिसरातील ७५ फुटी ‘बुलंद दरवाजा’च्या उभारणीमध्ये मंदिराच्या अवशेषांचा वापर

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajmer dargah on the site of shiv mandir rajasthan court accepts petition amy