Bomb Threat : अकासा या विमान कंपनीचं विमान बंगळुरुला जाण्यासाठी निघालं होतं, पण ते नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर परतलं आहे. विमानात बॉम्ब असल्याची धमकी आल्याने हे विमान दिल्लीला परतलं. मागच्या तीन दिवसांतली ही १२ वी धमकी ( Bomb Threat ) आहे. अकासा एअरलाईन्सच्या या विमानात १७४ प्रवासी बसले होते, त्यामध्ये तीन नवजात अर्भकं आणि सात क्रू मेंबर्सचाही समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द अकासा एअर इमर्जनसीने दिलेल्या सूचनेननंतर विमान वळवलं

द अकासा एअर इमर्जन्सीने वैमानिकाला विमान पुन्हा दिल्लीला आणण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हे विमान दिल्ली विमानतळावर परतलं. अकासाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. अकासाने याबाबत सांगितलं की आम्ही विमान उतरलं तेव्हा प्रवाशांना सुरक्षित आणि सुखरुप बाहेर काढलं. आम्हाला विमानात बॉम्ब अससल्याची धमकी मिळाली होती.

मंगळवारी तीन विमानानां बॉम्बसंबंधीच्या धमक्या

मंगळवारी तीन विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यातील दोन विमानं इंडिगो कंपनीची होती तर एक एअर इंडियाचं होतं. भारतात सातत्याने या घटना वेगवेगळ्या भागांमधून समोर येत असल्याने नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडला आहे.गेल्या काही दिवसांत विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या ( Bomb Threat ) अनेक घटना समोर येत आहेत. या अशा प्रकारच्या धमक्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता मंगळवारी देखली सात वेगवेगळ्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी ( Bomb Threat ) मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील महर्षि वाल्मिकी विमानतळावर या विमानाचे आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले, तर दुसरीकडे दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या एका एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या विमानाचे कॅनडामध्ये आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी एअर इंडियाच्या विमानासह सात वेगवेगळ्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती.

आत्तापर्यंत कोणत्या विमानांना धमक्या आल्या?

जयपूर ते बंगळुरूमार्गे अयोध्या (IX765) एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट, दरभंगा ते मुंबई (SG११६) स्पाईसजेट फ्लाइट, बागडोगरा ते बंगळुरू (QP१३७३) आकाशा एअर फ्लाइट, दिल्ली ते शिकागो (AI १२७) एअर इंडियाचे फ्लाइट, दम्मम (सौदी अरेबिया) ते लखनौ (6E ९८) इंडिगो फ्लाइट, अलायन्स एअर अमृतसर-डेहराडून-दिल्ली फ्लाइट (९I ६५०) आणि एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट (IX ६८४) मदुराई ते सिंगापूर.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akasa air bengaluru flight diverted due to bomb threat twelfth in 3 days scj