बादशाह अकबर बलात्कारी होता. सुंदर मुलींना उचलून घेऊन जायचा. त्याचा समावेश अभ्यासक्रमात करायला नको. अकबराबाबत अभ्यासक्रमात काहीही शिकवता कामा नये असं राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी म्हटलं आहे. अकबर महान वगैरे काहीही नव्हता. अकबर मीना बाजार लावत असेल आणि महिलांना तसंच मुलींना उचलून घेऊन जायचा. त्यांच्यावर बलात्कार करायचा. अशा बलात्कारी राजाविषयी अभ्यासक्रमात काहीही शिकवता कामा नये असं दिलावर यांनी म्हटलं आहे.
मदन दिलावर म्हणाले अकबर दुष्कर्म करणारा होता, अशा माणसाला महान म्हणता येणार नाही. ज्या लोकांनी अकबराच्या महानतेबाबत लिहिलं आहे ते गुलामगिरीच्या मानसिकतेतले असतील. गुलामगिरीची मानसिकता असलेल्या लोकांनी अकबराच्या इतिहासाचा समावेश अभ्यासक्रमात केला असेल असंही दिलावर यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीही दिलावर चर्चेत
मदन दिलावर हे काही दिवसांपूर्वीही चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शाळांमधल्या ड्रेस कोडबाबतही वक्तव्य केलं होतं. शाळांमध्ये ड्रेसकोड असला पाहिजे. जो कुणीही ड्रेस कोड पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणीही त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. ज्यामुळे मदन दिलावर चर्चेत आले होते. आता त्यांनी अकबर बलात्कारी होता त्याचा समावेश अभ्यासक्रमात करायला नको असं म्हटलं आहे.
उद्या कुणी हनुमानाच्या वेशात आलं तर चालेल का?
शाळेत येताना कुणी तोंड झाकून येतं, कुणी बुरखा घालून येतं, कुणी ओढणीने तोंड झाकतं. उद्या कुणी हनुमानाच्या वेशात आलं तर चालेल का? असा प्रश्न मदन दिलावर यांनी विचारला होता.