तेलंगणामध्ये काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विधानसभेत आमदारांना शपथ देण्याचा सोहळा पार पडत आहे. यासाठी ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) पक्षाचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांना हंगामी अध्यक्ष (Pro-Tem speaker) बनिवण्यात आले आहे. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्या वतीने ओवेसी यांची शनिवारी नियुक्ती केली गेली. आता ओवेसी आमदारांना शपथ देण्याची जबाबदार पार पाडणार आहेत. मात्र भाजपाने यावर आक्षेप नोंदविला आहे. गोशामहलचे भाजपाचे आमदार टी. राजा सिंह यांनी आमदारपदाची शपथ घेणार नसल्याचे सांगितले आहे. शपथविधीवर त्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in