उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या चित्रकूटमध्ये मागील पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. या बैठकीमध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले. तसेच या शिबिरामध्ये राजकीय विचारमंथनही झालं. बैठकीदरम्यान संघाचे संचालक मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालसंदर्भात मोठा निर्णय घेतल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये संघटनेची पाळंमुळं मजबूत करण्यासाठी राज्याची तीन खंडांमध्ये विभागणी करुन काम करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य कार्यालय कोलकातामध्ये असेल, मध्य बंगालमधील कारभार वर्धमानमधून पाहिला जाईल तर राज्यातील उत्तरेकडील भागामधील संघाचं काम सिलीगुडीमधून हाताळलं जाईल. पुढील वर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाने ही रचना केल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे संघाने आता मुस्लीम बहुल भागामध्ये शाखा सुरु करण्याचा निर्णयही घेतलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा