देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा चालू आहे. निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या राज्यांमध्ये सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. एकीकडे या घडामोडी चालू असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षात असणाऱ्या समाजवादी पक्षात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद इतका टोकाला गेला की अखिलेश यादव यांनी चक्क जेपीएनआयसीच्या कम्पाऊंडवरून उडी मारून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारवर परखड टीकाही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं झालं काय?

लखनौमधील जेपीएनआयसी अर्थात जयप्रकाश नारायण इंटरनॅशनल सेंटरबाहेर आज मोठा गदारोळ झाला. जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त सपाचे काही नेते व कार्यकर्ते पोहोचले होते. त्यात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही होते. जयप्रकाश नारायण यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सपाचे नेते व कार्यकर्ते केंद्रात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना बाहेरच अडवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव आत जाण्याची परवानगी पोलिसांकडून नाकारण्यात आली.

अखिलेश यादव यांचे वडील दिवंगत मुलायमसिंह यादव यांच्या पुढाकाराने या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पोलिसांना विनंती करूनही आत जाण्याची परवानगी न मिळाल्यामुळे अखेर अखिलेश यादव यांनी थेट केंद्राच्या कम्पाऊंडवरून उडी मारून आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ सपाचे इतरही काही नेते व कार्यकर्ते अशाच प्रकारे कम्पाऊंडवरून उड्या मारून आत गेले.

अखिलेश यादव यांची आगपाखड

दरम्यान, अखिलेश यादव यांनी या सगळ्या प्रकारावरून सत्ताधारी भाजपा व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आगपाखड केली आहे. “मला थांबवण्यासाठी त्यांनी इथे पोलीस तैनात केले हे पाहून वाईट वाटलं. पोलीस अधिकाऱ्यांनाच माहिती नाही की यासंदर्भात कुणाला विचारायचं. मला नेमकं कोण थांबवतंय हे जनतेला कळायला हवं. हे लोकांचा आवाज दाबत आहेत. तुम्ही जयप्रकाश नारायण यांच्या आयुष्यावर आधारित संग्रहालय बंद करत आहात. तुमचं कोणतं अपयश तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करत आहात? फक्त संग्रहालयच नाही, पण इथली इमारतही बंद करत आहात”, असं अखिलेश यादव यावेळी म्हणाले.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री बैठकीआधी खेळत होते ‘कॅण्डी क्रश’; भाजपाने टीका करताच म्हणाले, “तिथे बऱ्यापैकी लेव्हल्स…”

अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना जेपीएनआयसीचं ११ ऑक्टोबर २०१६ रोजी उद्घाटन झालं होतं. २०१७मध्ये भाजपा सत्तेत आली. जेपीएनआयसीची इमारत बांधण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेण्याची एक विनंती योगी आदित्यनाथ यांच्याकडे करण्यात आली. खुद्द अखिलेश यादव या प्रकल्पाच्या कामावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे यातील घोटाळ्याचा आरोप थेट अखिलेश यादव यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचं बोललं जात आहे.