लखनऊ :  समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मौर्य भाजपमधून फुटल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकते, असा दावा केला आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी यादवांवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा >>> नितीश कुमार सोनिया गांधींना भेटणार ; म्हणाले, “गरज पडल्यास आम्ही…”

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार फोडून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदी झाले. उत्तर प्रदेशात हाच प्रयोग करण्याची तयारी अखिलेश यादवांनी दर्शवली आहे. भाजपचे १०० आमदार सोबत घेऊन आल्यास मौर्य यांना मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, असे यादव म्हणाले. उत्तर प्रदेशात पुन्हा निवडून आलेल्या आदित्यनाथ सरकारमध्ये मौर्य यांचे उपमुख्यमंत्रीपद कायम राहिले आहे. असे असताना यादवांनी दिलेल्या या ‘प्रस्तावा’मुळे उत्तर प्रदेश भाजपमध्ये आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यादवांच्या प्रस्तावावर मौर्य यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

भाजपचा पलटवार

उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी ट्विटरवरून यादवांना उत्तर दिले आहे. ‘मौर्य हे पक्षाचे निष्ठावान आणि भाजपची विचारधारा मानणारे आहेत. अखिलेश यांनी आपले सहकारी, कुटुंब, पक्ष आणि आमदारांची काळजी करावी. कारण सपाचेच काही आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असे चौधरींनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश राजकीय बलाबल

एकूण जागा      ४०३

सत्ताधारी पक्ष   २७२

भाजप         २५४

अपना दल       १२

निषाद पार्टी      ६

विरोधक         ११९

समजावादी पार्टी १११

राष्ट्रीय लोकदल ८

इतर    १२

सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी)        ६

काँग्रेस  २

जनसत्ता दल   २

बसप   १

रिक्त   १

Story img Loader