पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तिथल्या सुंदर बेटांवर भ्रमंती केली. मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंना लोकांकडून पसंती मिळत आहे. परंतु, मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवमधील काही नेत्यांचा तीळपापड झाला आहे. मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टीका केली आहे, तर काही मंत्र्यांनी भारतीय संस्कृतीला लक्ष्य केलं आहे, भारतीयांवर वर्णद्वेषी टीप्पण्या केल्या आहेत. त्यामुळे भारतात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ‘बॉयकॉट मालदीव’ असा हॅशटॅग ट्रेंड होतं.

दरम्यान, सतत मालदीववारी करणाऱ्या बॉलिवूड कलावंतांनीदेखील मालदीवमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एक्सवर एक पोस्ट करून त्याचा संताप व्यक्त केला आहे. अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मालदीवमधील नेत्यांनी भारतीयांबद्दल चिथावणीखोर आणि वर्णद्वेषी वक्तव्ये केली आहेत. जो देश तुमच्या देशात सर्वाधिक पर्यटक पाठवतो, त्या देशाबद्दलच तुमचे नेते अशी वक्तव्ये करत आहेत हे पाहून आश्चर्य वाटलं. आम्ही आमच्या शेजाऱ्यांबरोबर चांगले आहोत, परंतु, आम्ही असा द्वेष का सहन करायचा? मी अनेकवेळा मालदीवला भेट दिली आहे आणि या देशाची नेहमीच प्रशंसा केली आहे. परंतु, आता सन्मान महत्त्वाचा आहे. चला आपण आपल्या देशातील समुद्रकिनाऱे पाहुया आणि आपण आपल्या देशाचं पर्यटन वाढवू.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!

दुसऱ्या बाजूला, भारत सरकारनेही मालदीवमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांचा निषेध नोंदवला आहे. मालदीवमधील मोहम्मद मुइज्जू यांच्या सरकारमधील मंत्री मरियम शिउना, मालशा शरीफ आणि महजून माजिद यांनी सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. भारत सरकारने हा मुद्दा मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर उपस्थित केला. मालदीवमधील भारताच्या उच्चायुक्तांनीदेखील या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मालदीव सरकारने अधिकृत निवेदन जारी केलं. त्यामध्ये मालदीव सरकारने म्हटलं आहे की, आमच्या मंत्र्यांनी केलेली व्यक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक आहेत. मालदीव सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

मालदीवमधील मंत्र्यांनी नेमकी काय वक्तव्ये केली आहेत?

मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ हे पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत म्हणाले, भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत आहे. ही खेदाची बाब आहे. लक्षद्वीपचे पर्यटन तुम्हाला वाढवायचे हे मान्य. परंतु, ही भ्रामक कल्पना आहे. आम्ही ज्या प्रकारे सेवा पुरवतो, तशी सेवा तुम्ही लक्षद्वीपमध्ये देऊ शकता का? तुम्ही स्वच्छता पाळू शकता का? हॉटेलच्या खोल्यांमध्ये एकप्रकारचा वास येतो, त्याचं काय करणार?

हे ही वाचा >> पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त वक्तव्ये भोवली, मालदीवमधील तीन मंत्री निलंबित

मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिउन यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोंवर कमेट करत त्यांना ‘विदूषक’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ संबोधलं होतं. त्यानंतर त्यांनी ही कमेंट डिलीट केली. परंतु, त्याचे स्क्रीनशॉट आता व्हायरल होत आहेत. यासह मालदीवमधील काही मंत्र्यांनी भारतीयांवर वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या आहेत.