तेल अविव, दोहा : इस्रायलने रविवारी ‘अल जझीरा’ उपग्रह वृत्तवाहिनीची स्थानिक कार्यालये बंद करण्याचा आदेश दिला. ‘अल जझीरा’ आणि इस्रायलमधील बिन्यामिन नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतान्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘अल जझीरा’चे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाहिनीच्या कार्यालयावर छापा टाकून तिथे तपासणी करण्यात आली. त्यानंतर कार्यालय बंद करण्यात आले. वृत्तवाहिनीचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इस्रायली अधिकाऱ्यांनी जेरुसलेम येथील हॉटेलमध्ये थाटलेल्या ‘अल जझीरा’च्या कार्यालयात छापा टाकल्याचे इस्रायल आणि ‘रॉयटर्स’च्या सूत्रांनी सांगितले. सरकारच्या निर्णयामुळे इस्रायलचा ‘अल जझीरा’विरुद्ध दीर्घकाळ चाललेला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा