पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे मोमिनपूर भागात झालेल्या हिंसाचारामागे ‘अल कायदा’, ‘आयसिस’चा हात असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. बंगालचे विधानसभा विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी पत्रकारपरिषदेत हा आरोप केला आहे. याशिवाय या हिंसाचारामुळे कोलकातामधून जवळपास ५ हजार हिंदू पळून गेले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय सुवेंदु अधिकारींनी कोलकाता पोलीस आयुक्तांना आव्हान देत म्हटले आहे की, किमान तुमचे तीन अधिकारी या घटनेत जखमी झालेले आहेत. याशिवाय तीन आयपीएस अधिकारी रुग्णालयात आहेत.

सुवेंदु अधिकारींनी म्हटले की, तुम्ही भाजपा नेत्यांना परिसरात येण्यापासून रोखले आहे आणि इंटरनेटवर निर्बंध आणले आहेत. तुम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांनाही अटक केली आहे. आम्ही आमच्या हातात हिंसाचाराची छायाचित्रे धरली आहेत. आता तुम्ही समजू शकता की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणाला निवडलं आहे. त्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केली आहे. बंगाली हिंदूंनी यापुढे स्थलांतर करू नये, अशी आमची इच्छा आहे. आम्ही मोमिनपूर हिंसाचाराबाबत बंगालचे राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाने तीन मागण्या केल्या आहेत –

भाजपाने या पत्राद्वारे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. या भागात सीआरपीएफचे जवान तातडीने तैनात करण्यात यावेत. पीडितांना राज्य सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि या हिंसाचाराचे व्हिडिओ फुटेज तपासावे पाहिजे व दोषींना अटक करून कठोर आरोप लावले जावेत. अशीही माहिती सुवेंदु अधिकारींनी दिली आहे.