अल-कायदाने पुन्हा एकदा अमेरिकेला इशारा दिला आहे. येमेनमधील अल-कायदाचा प्रमुख कासिम अल-रिमी याने एका संदेशाद्वारे हा इशारा दिला आहे. एप्रिलमध्ये बोस्टनमध्ये झालेले स्फोट आणि व्हाइट हाऊसला विषारी पत्र पाठवण्याचे प्रकार पाहता सुरक्षा व्यवस्था भेदता येते हेच सिद्ध झाल्याचे त्याने म्हटले आहे. तुमची सुरक्षा नियंत्रणात नाही आणि हल्ले थांबवता येणार नाहीत अशी धमकीही दिली आहे. ‘अमेरिकी नागरिकांना पत्र’ अशा आशयाखाली हा संदेश आहे. अनपेक्षितपणे तुमच्यावर हल्ला होईल आणि तुमचे नेते संरक्षण करू शकणार नाहीत असेही त्याने म्हटले आहे. जिहादी गट केवळ अफगाणिस्तानमध्येच नव्हे तर ते जगभर पसरले आहेत त्यांना तुम्ही संपवू शकणार नाही अशी आव्हानाची भाषा अमेरिकेला वापरली आहे.

Story img Loader