Ban alcohol in Goa : गोवा हे नाव जरी ओठावर आलं तर अनेकांच्या नजरेसमोर येतो उधाणलेला समुद्र आणि बाटलीतून फेसाळत बाहेर पडणारे मद्य. गोवा म्हणजे मजा, मस्ती आणि मद्य, असे समीकरण गोव्यात जाणाऱ्या प्रत्येकाचे असते. गोव्यात येऊन नुसता धिंगाणा करायचा, असं प्रत्येकाला वाटतं. मात्र गोव्यातल्या लोकप्रतिनिधिंना आता असं वाटत नाही. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आपापले मुद्दे रेटत असताना भाजपाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मद्यबंदीची मागणी लावून धरली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना प्रेमेंद्र शेट यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. ते म्हणाले, “गोव्यामध्ये गेल्या काही वर्षात मद्याच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढली आहे. मद्य सेवनामुळे काही जणांचा मृत्यू ओढवला आहे. हे सर्व थांबविण्यासाठी मी मद्यबंदीची मागणी सरकारकडे केली. गोव्यात पर्यटक केवळ मद्यासाठी येत नाहीत. तर येथील सौंदर्य पाहण्यासाठीही अनेक पर्यटक येतात.”

marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
cancer warning , alcohol bottles,
मद्याच्या बाटल्यांवर कर्करोगाच्या धोक्याचा इशारा लिहा, जनहित याचिकेद्वारे मागणी
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Madhya Pradesh liquor ban
मध्य प्रदेश सरकारचा १७ धार्मिक शहरांत दारूबंदीचा निर्णय; पण अंमलबजावणी अवघड का?
Mohan Yadav On MP Liquor Ban
MP Liquor Ban : मध्य प्रदेशातील धार्मिक क्षेत्र असलेल्या १७ शहरात मद्यविक्रीस बंदी, मुख्यमंत्री मोहन यादव यांचा मोठा निर्णय
bombay high court orders to stand with dont drink and drive banner at traffic junction
सिग्नलवर ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’चा फलक घेऊन उभा राहा ; उच्च न्यायालयाची आगळी शिक्षा
TIk Tok Ban Reason| Which Countries have Banned TIk Tok App and Why
TIk Tok Ban Reason : भारतात TikTok बंदीची पाच वर्षे, आणखी कुठल्या देशांमध्ये आहे बंदी? काय आहे कारण?

हे वाचा >> गोव्यातील ‘सनबर्न फेस्टिवल’वर बंदी? स्थानिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांचा या महोत्सवाला विरोध का?

प्रेमेंद्र शेट म्हणाले की, विकसित भारत आणि विकसित गोवा यासाठी गोव्यात संपूर्णपणे मद्यबंदी करायला हवी. आपण गोव्यात मद्य उत्पादन करून इतर राज्यात त्याची विक्री करू शकतो. मात्र गोव्यात मद्य घेण्यास बंदी केली पाहीजे. उत्तर गोव्यातील मायेम विधानसभेतून पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रेमेंद्र शेट यांनी आला मुद्दा समजावून सांगताना गोव्यात मद्यपानामुळे होणाऱ्या अपघातांचा दाखला दिला.

सत्ताधाऱ्यांचाही मद्यबंदीला विरोध

दरम्यान सभागृहात आमदार शेट यांनी ही मागणी करताच सभागृहात उपस्थित आमदारांमध्ये हशा पिकला. गोव्यात मद्य उत्पादन करावे आणि त्याची विक्री इतर राज्यात करावी, अशीही मागणी शेट यांनी केली. दुसरीकडे शेट यांच्या मागणी सत्ताधारी आमदारांनीच फारसा प्रतिसाद दिला नाही. तसेच अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विरोध करताना सांगितले की, मद्यबंदी लागू करण्यापेक्षा मद्य सेवनासंबंधी काही नियम सरकारने लागू करायला हवेत.

गोव्यातील हॉटेल व्यवसाय बंद करावा का?

तसेच भाजपाच्या महिला आमदार डेलीलाह लोबो यांनीही शेट यांच्या मागणीचा विरोध केला. माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या, “शेट यांना गोव्यातील रेस्टाँरंटचा व्यवसाय बंद करायचा आहे का? गोव्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात, त्याला मद्य हाही एक घटक कारणीभूत आहे. मद्यबंदी करून आपण काय साध्य करणार आहोत. आपण हॉटेल व्यवसायही बंद करून टाकावा का?” आमदार डेलीलाह लोबो आणि त्यांचे पती आमदार मायकल लोबो (कलंगुट) यांचा गोव्यात हॉटेल व्यवसाय आहे.

Story img Loader