अल्जेरियामध्ये मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या ओलीस नाटय़ाचा अखेर रक्तरंजित शेवट झाला. आता यामधील बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे आव्हान अल्जेरिया सरकारसमोर उभे राहिले आहे. अल्जेरियन सहारामधील गॅस प्रकल्पावरील या ओलीस नाटय़ामध्ये २३ विदेशी व अल्जेरियन ओलीस मृत्युमुखी पडले.
जेजीसी समूहाच्या जपानी अभियांत्रिकी कंपनीने आपले १० जपानी व सात विदेशी कर्मचारी बेपत्ता असल्याचा दावा केला आहे. तर आपले पाच नागरिक बेपत्ता आहेत अथवा मारले गेले असल्याची भीती ब्रिटनने व्यक्त केली. आपल्या देशातील ५२ जण ओलीस होते. त्यांच्याबाबतची कोणतीही ताजी माहिती अद्याप मिळाली नसल्याचे फिलिपिन्सने स्पष्ट केले.
मालीमधील दहशतवाद्यांच्या विरोधात फ्रेंच सैन्याने सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात दहशतवाद्यांनी बुधवारी अल्जेरियन वाळवंटातील गॅस प्रकल्प ताब्यात घेतला होता. या प्रकरणी कोणती कारवाई केल्यास गॅस प्रकल्प उडवण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती.

Story img Loader