उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूर येथील एका जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित शेतकरी बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना कागदोपत्री मृत घोषित केल्याचं समोर आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये मृत घोषित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडित शेतकरी अवाक् झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं प्रकरण काय आहे?

‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित शेतकरी उसाच्या शेतीची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेले होते. पण बँकेत गेल्यानंतर त्यांना भलतीच माहिती मिळाली. ते जिवंत असतानादेखील त्यांना सरकारी कागदपत्रांमध्ये मृत घोषित केल्यास समोर आलं आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिलहरचे एसडीएम राशी कृष्णा यांनी पत्रकारांना सांगितलं की, “जून २०२१ मध्ये तिलहरच्या बीडीओने त्यांना मृत घोषित केलं होतं. यामध्ये पंचायत सचिवांचा निष्काळजीपणा उघडकीस आला, त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. हा अहवाल आम्ही जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे पाठवला असून पीडित शेतकऱ्याला याबाबतचं प्रमाणपत्र देण्यात येईल.”