संघर्षग्रस्त इराकमधील काही भागांतील भारतीयांना सुरक्षितरीत्या सुटका करण्यासाठी रालोआ सरकारसमोर सर्व पर्याय खुले असतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह बुधवारी दिली.  
आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत आहेत. काही महत्त्वाच्या सूचनाही आम्हाला मिळाल्या आहेत, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. इराकमधील भारतीयांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवण्याच्या  पर्यायाबाबत विचारले असता त्यांनी भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले. इराकमधून आतापर्यंत ३४ जणांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, इराकमधील अराजकसदृश परिस्थितीबाबत सातत्याने परराष्ट्र मंत्रालयाकडून तेथील भारतीयांसाठी सातत्याने मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत.

Story img Loader